आस्तिक मुनींची शपथ आणि इतर अफवा
1 min read

आस्तिक मुनींची शपथ आणि इतर अफवा

आस्तिक मुनींची शपथ आणि इतर अफवा

काल नागपंचमी होती. नागपंचमी आली  की झोके बांधने, आईने बनवलेला कापसाचा नागोबा आणि त्यासाठी बनवलेला प्रसाद या गोष्टी आठवतात. यासोबत अजून एक गोष्ट आठवते, ती म्हणजे "आस्तिक मुनींची शपथ". शाळेमध्ये असताना एक अफवा प्रसिद्ध होती. घरावर "आस्तिक मुनींची शपथ" असे लिहिल्याने साप घरात प्रवेश करत नाही असे त्यांचे म्हणणे होते. आस्तिक मुनींची कुठेतरी पौराणिक कथा आहे. त्यांनी त्यात नागोबांना धडा शिकवला असावा. यावरऊन हि अफवा निघाली होती.

अश्या अनेक अफवा शाळेत प्रसिद्ध होत्या. त्या फक्त आमच्याच शाळेत प्रसिद्ध नव्हत्या हे मला कॉलेज ला आल्यावर कळाले. अशातच अजून एक सुप्रसीध्द अफवा म्हणजे हाकमारी. हाकमारी एक चेटकीण असते. ती दररोज रात्री घरोघरी दार वाजवत फिरते. ती घरातील पुरुषांची नावाने ३ वेळा हाक मारते आणि तिच्या हाकेला उत्तर दिल्यास ती तुम्हाला घेऊन पळून जाते असे प्रचलित होते. तिला घरात न येउ देण्यासाठी घरावर काही चिन्हे काढावी लागत असत. मित्रांनी स्वतः च्या गल्लीत झालेलं किस्से एकदम शपथ घेऊन सांगितल्याने मी पण ती चिन्हे घरावर खडूने काढल्याचे आठवते. (याच अफवेवर २ वर्षांपूर्वी स्त्री नावाचा एक चित्रपट पण आलेला आहे, फक्त महाराष्ट्रांत नाही तर पूर्ण देशात हि अफवा होती, चित्रपट खूप विनोदी आहे).

उच्च माध्यमिक शाळेत येईपर्यंत या गोष्टी अफवा आहेत असे समजले होते. पण प्राथमिक शाळेत मला या गोष्टीवर चांगलाच विश्वास बसला होता. मोबाइल/ संगणक आणि इंटरनेट नसलेल्या जगात हि विरुंगुळ्याची साधने होती, शाळेत तावातावाने गप्पा मारणे व माहित असलेल्या अफवा अजून रंगवून सांगणे हा एक शालेय जीवनाचा भाग होता. तो भाग आज घरी बसून मोबाइल च्या स्क्रीन वर धडे घेणारी पिढी मिस करत आहे.

Enjoying these posts? Subscribe for more